Quantcast
Channel: Marathi Recipes : Maharashtra Food collection, read recipes, Indian recipes, food tips, hot recipes, Maharashtra Food Guide
Viewing all 207 articles
Browse latest View live

नान कटाई

$
0
0

Nan Katai

nan katai

तयारीची वेळ १५ मिनिटे,~~~:  ओव्हन तापमान २५० ०f ~~: वेळ ३०ते ४५ मिनिटे,
साहित्य -: मैदा १४० ग्र्याम, वनस्पती ९० ग्र्याम (डालडा), पिठी साखर ११५ ग्र्याम, खाण्याचा सोडा १/२ टी.स्पून, अमोनिया १/२ टी.स्पून, दही २ टी.स्पून, वेलची ५ ते ६, पिस्ते, चारोळी.

कृती-: मैदा चाळुन घ्यावा. वनस्पती व साखर एकत्रित करून चांगले फेसावे. त्यात सोडा, अमोनिया, दही व वेलचीची पूड घालून परत चांगले फेसावे, नंतर त्यात चाळलेला मैदा घालून गोळा  तयार करून घ्यावा. नंतर २० लहान गले करून त्यांना पेढ्यासारखा आकार देऊन चपटे करावे. त्यावर पिस्त्याच्या चकत्या लावाव्या अगर चारोळी लावावी किंवा दोन्ही लाउ शकता तूप लावलेल्या ताटात ठेवून ते बेक करावे.

Source : Marathi Unlimited.


काजू बटाटा आमटी

$
0
0

Kaju Batata Amti.

Hirva batata kaju amti marathi unlimited

साहित्य -: बटाटे,काजू, ३तें४ लवंगा, दालचिनी, शहाजिरे, २ ते ३ वेलदोडे, काळी मिरी, जायपत्री, एक चमचा खसखस, धने, आल्याचा १ ईंच तुकडा, लसून ४ पाकळ्या, सुक खोबर, थोडा कांदा, एका नारळाचे दुध , लाल मिरची पूड,  तूप, दही, आवडी नुसार हवे तर जायफळ पूड.

कृती -: प्रथम वर दिलेला मसाला वाटून घ्यावा, तूप किंवा तेला वर कांदा भाजून सर्व मसाला परतून घावा व त्यात एक चमचा दही टाकावा. त्यानंतर काजू व बटाट्याचे चौकोनी कापलेले तुकडे टाकून सर्व शिजवून घ्यावे. बटाटे शिजल्या नंतर त्यात नारळाचे दुध घालावे. दुध फुटू नये म्हणन मिश्रण ढवळाव. आमटी तयार.

Source : Marathi Unlimited.

मिक्स उपमा

$
0
0

Mix Upama.

mix upama

साहित्य –: मक्याचे सुके दाणे एक कप, तांदळाच्या कण्या अर्धा कप, चिरलेला कांदा एक, तीन ते चार मिरच्या, तिखट, मीठ चवीपुरते, चिमुटभर हिंग, एक कढीपत्ता. कोथिंबीर.

कृती -: कणसाचे दाणे प्रेशर कुकर मध्ये वाफून घ्यावेव जाडसर वाटून घ्याव्या.कण्या पंधरा मिनिटे भिजत घालाव्या नंतर पाणी काढून घ्याव्या. तेल गरम करून प्रथम हिंग घालावे. नंतर कढी पत्ता, कांदा मिरचीचे तुकडे घालून लालसर होऊ द्यावे. चवी नुसार तिखट, मीठ घालून फोडणी शिजवून त्यात कंणसाचा भरडा व कण्या घालून फोडणीत शिजू द्यावे, आवश्यकते नुसार पाणी टाकावे. जास्त घालू नये मोकळे होऊ द्यावे नंतर थोडे लिंब रस घालावे, बारीक चिरलेली कोथिम्बिर घालावी.

Source : Marathi Unlimited.

पालक अंडाकरी

$
0
0

Palak Andakari

palak andakari recipes

साहित्य–: दिड पाव पालक भाजी, चार अंडे, चार हिरव्या मिरच्या, दोन कांदा, चार पाकळ्या लसून,१/२ ईंच आले, एक चमचा जिरे, १/२ लिंबू, कोथिंबीर, तेल, मोहरी एक चमचा.

कृती–: अंडी उकडून घ्यावी, त्याचे साल  काढून, थोडे तेल गरम करून अंडी त्यात परतावी, वरचे कवच लाल सर होऊन कवचाला फोपंडे येईल, ते बाजूला ठेवून जिरे, आले, लसून, कांदा तेलात परतून मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी, पालक स्व्च्छ करून बारीक कापावी व वाफवून घ्यावी, मिक्सर मधून काढावी. एक कांदा व कोथिंबीर  बारीक चिरून घ्याव. फोडणीसाठी मोठे दोन चमच्च तेल टाकावे, एकदम गरम झाल्यावर, मोहरी टाकावी, त्यानंतर कांदे लसणाची पेस्ट टाकून लालसर भाजावी, त्यातच थोडी बारीक कोथिंबीर गरम तेलातच टाकावी, हिरवी मिरची चे तुकडे नंतर १/२ चमचा हळद , चवी नुसार तिखट, मीठ टाकून फोडणी चांगली शिजू द्यावी, नंतर पालक टाकावी, भांड्यावर झाकण ठेऊन शिजू द्यावी, थोडे पाणी घालावे, बुडाला भाजी लागू नये म्हणून लक्ष करावे, जास्त घट्ट करू नये, त्यात लिंबाचा रस पिळावा. काही वेळात भाजी शिजल्या नंतर त्यात अंडी टाकावी, थोडावेळ भाजीत अंडी टाकून पाहिजे तेवढाच रस्सा ठेवावा. दोन मिनिटे ठेवून बारीक चिरलेली बाकी कोथिंबीर टाकावी.हवे असल्यास १/२ चमचा मटन मसाला टाकावा. साध्या अंडाकरी पेक्षा पालक अंडाकरी स्वादिष्ट वाटते.

Source : Marathi Unlimited.

पालक मटण

$
0
0

Palak Mutton

palak mutton marathi unlimited

साहित्य-: अर्धा किलो मटण, पाव किलो पालक, दोन मोठे कांदे, ६ ते ७ लसून पाकळ्या, १ ईंच आले, १ ईंच खोबरे, कच्चा मसाला, मटण मसाला एक चमचा (पावडर) तिखट मीठ चवी नुसार, हळद, कोथिंबीर, १/२ लिंबू,  (नेहमी प्रमाणे मटन मसाला वै) अर्धा किलो, मटन तर पाव किलो पालक याप्रमाणे. मटन कुकरमध्ये किंचित हळद घालून उकळून घ्यावे, पालक कापून मिक्सर मध्ये लिक्विड करून घ्यावी. संपूर्ण मसाले कांदा तेलावर भाजून घ्यावे. यांची मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावी. एक कांदा व कोथिंबीर बारीक कापावी, एक कांदा मसाल्यात टाकावा.
*** प्रथम गरम तेलात बारीक कांदा व बारीक चिरलेली कोथिम्बिर टाकावी नंतर मसाला पेस्ट टाकावी, फोडणीत मसाला होऊ द्यावा,लिंबू रस पिळावा. फोडणी शिजल्या नंतर चवी नुसार तिखट, मीठ, १/२ चमचा हळद टाकावी, लालसर शिजू द्यावी. शिजल्या नंतर  पालक पेस्ट टाकून शिजवावी, त्यानंतर मटण टाकावे. ते चागले शिजू द्यावे नंतर बाकी कोथिम्बिर टाकावी व मटन मसाला पावडर टाकावी थोडे उकळू द्यावे आवडी नुसार रस्सा ठेवावा, या प्रमाणे पालक मटण तयार होईल. हि भाजी फार स्वादिष्ट वाटते व पचायला हलकी होते.

Source : Marathi Unlimited.

भरली –खिमा वांगी

$
0
0

Khima wangi.

khima recipes tips

साहित्य–: ४ लांबट आकाराची मध्यम वांगी २ मध्यम आकाराचे बटाटे, ४ उकडलेली अंडी, पाव किलो खिमा, तीन मध्यम आकाराचे कांदे, ४ हिरव्या मिरच्या, १/२ चमचा हळद, २ चमचे आले- लसून पेस्ट,१/२ चमचा गरम मसाला, २ चमचे व्हिनेगार,कोथिंबीर, मीठ, २ मोठे , च्चमच तेल.

कृती -: खिमा धुवून अर्धे आले-लसून पेस्ट व मसाला घालून शिजवून घ्यावा. तो कोरडा करावा.  ब्तात्याच्या लहान व पातळ फोडी कराव्या. कांदे बारीक कापावेत. अंडी सोलून बारीक तुकडे करावे. मिरची कोथिम्बिर बारीक कापावी, वांगी उभी कापावी पण देठाकडून कापू नये. दोन भाग करावे. आतील गर हलकेच काढून पोकळ करावे. वांगी मोडणार नाही याची काळजी घ्यावी. तेल गरम करायला ठेवावे. एकदम गरम झाल्यावर कापलेला अर्धा कांदा टाकावा. परतून चांगला झाला कि त्यात बटाटे घालून तेलात होऊ द्यावेव आले लसून पेस्ट, मिरच्या, मीठ व अंड्याचे तुकडे, हळद पूड घालावी. सर्व शिजवून काढावे, त्यात कोथिंबीर व शिजवलेला खिमा घालावा. सर्व मिश्रण ढवळून मिसळवून घ्यावे. नंतर वांग्याच्या पोकळ भागी हे मिश्रण भरावे व वांग्याचे दोन्ही भाग मजबूत स्व्च्छ जाड दोर्याने बांधून घ्यावे. पुन्हा तेल गरम करायला ठेवून कडक झाले कि त्यात उरलेला बारीक कांदा टाकून परतावा तांबूस झाला कि त्यावर भरलेली वांगी ठेवावी. भांड्यावर घट्ट  झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून मंद आचे वर वांगी शिजवावी. वांगी मउ शिजली कि खाली काढून त्यात कोथिंबीर घालावी, वांगी तैयार झाली. नंतर त्याचे दोरे काढून घ्यावे. हे पोळी किंवा नान बरोबर फार छान लागतात.

Source : Marathi Unlimited.

राजमाची आमटी

$
0
0

Rajmachi Amti.

rajmyachi amti

साहित्य -: एक कप राजमा, दोन कांदे, १/२ ईंच आले, ७ ते ८ लसून पाकळ्या, दो मिरच्या, दोन टमाटो,१/२ चमचा जिरे, तेल.

कृती -: राजमा रात्रीच भिजत घालावा. दुसर्या दिवशी सोडा टाकून वाफून घ्यावा. कांदे बारीक चिरून घ्यावे. आले, लसून, जिरे, मिरच्या, टमाटरचे बारीक तुकडे करून सर्व एकत्र करून त्याची पेस्ट करावी. तेल गरम झाले कि मोहरी टाकून हा मसाला टाकून लालसर होऊ द्यावा, नंतर त्यात शिजलेला राजमा टाकून वाफ येऊ द्यावी. थोडे पाणी घालावे. चवी नुसार मीठ घालावे वाटल्यास थोडे लोणीहि घालू शकता.

Source : Marathi Unlimited.

मेथीच्या पुर्या

$
0
0

Methi Puri.

Methi Puri recipes marathi unlimited

साहित्य -: दीड पाव मेथी भाजी, १/२ वाटी ज्वारीचे पीठ, पाव वाटी कणिक, पाव वाटी बेसन, ५ हिरव्या मिर्च्या,५ पाकळ्या लसून, २ चमचे तीळ, दही, १/२ वाटी, तिखट, मीठ चवी नुसार, एक चमचा साखर.

कृती -: लसून, जीर, हिरव्या मिरच्या चांगल्या ठेचून घ्याव्या, भाजी बारीक चिरून, वाफून घ्यावी, थोडे पाणी शिल्लक असल्यास काढून घ्यावे. हवे तर थोडे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे, नंतर त्यात कणिक, ज्वारीचे पीठ, बेसन घालून एकत्रित करून तिखट, हळद, तीळ घालून थोडे मोहन करावे, व ठेचलेला मसाला, बारीक केलेली मेथी एकत्रित करून द्ह्यान घट्टसा गोळा तयार करावा.  त्याच्या छोट्या पुर्या लाटाव्या व गरम तेलात तळून घ्याव्या. या हिर्व्यागार पुर्या दिसतातही छान व गरमागरम स्वादिष्ट लागतात.

Source : Marathi Unlimited.


भाजणीच्या चकल्या

$
0
0

chakali recipes

Bhajnichya Chakalya.

साहित्य-: चार वाटी तांदूळ, १/२ वाटी हरबरा डाळ पाव वाटी उडदाची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, दिड् वाटी पोहे, पाव वाटी साबुदाणा, थोडे धने, तिखट, मीठ, तीळ, ओवा.

कृती -: तांदूळ धुवून घ्यावे थोडे ओलसर असतानाच भाजून घ्यावे, तिन्ही डाळीं वर पाणी शिंपडून भाजून घ्यावी, पोहे भाजून घ्यावे,हि सर्व भाजणी व धने एकत्र करून दळून घ्यावी. जिरे हिरवी मिरची वाटून घ्यावी, हळद, तिखट, चवी नुसार मीठ, चमचा भर ओवा, व तीळ घालावे व उकलीच्या पाण्याने मोहन न घालता भिजवून साधारण घट्ट भिजवावे, त्याच्या चकल्या पाडाव्यात. व तेलात तळून घ्याव्या . या खुसखुशीत चकल्या आठ दहा दिवस चांगल्याच राहतात.

Source : Marathi Unlimited.

कलिंगड व कोळंबीची भाजी

$
0
0

Kalingard and Kolambichi Bhajee.

watermelon to a curry dish

साहित्य -: कलिंगड चा लाल भाग खाण्या साठी काढून, उरलेला पांढरा भाग घ्यावा. त्याची हिरवी साल काढून घ्यावी. नंतर पांढर्या भागाच्या पातळ व लहान फोडी करून घ्याव्या. चार वाट्या कलिंगडा च्या फोडी, एक मोठा कांदा, दीड वाटी ओले खोबरे, चार ते पाच लाल मिरच्या, एक चमचा धणे, चार-पाच मिरी, अर्धा ईंच हळकुंडाचा तुकडा, एक वाटी सोललेली पांढरी कोलंबी, दोन चमचे खोबरेल तेल.

कृती-:  कांदा बारीक कापावा, कलिंगडच्या फोडी, कोलंबी व अर्धा कापलेला कांदा अगदी कमी पाण्यात शिजत ठेवावा. कारण कलिंगड ला अंगचेच पाणी सुटते. एक चमचा तेलात मिरच्या, धणे, हळदी चा तुकडा व मिरी जरा भाजून घ्यावी हा मसाला व खोबरं वाटून घ्यावे. कलिंगड व कोलंबी शिजली कि त्यात वाटलेला मसाला तेच मसाल्याचे पाणी व चवी नुसार मीठ घालावे, भाजीला घट्ट रस्सा राहील ईतकी शिजवावी. मग पळी मध्ये तेल तापवून त्यात उरलेला कांदा परतावा. कांदा बदामी झाला कि भाजीत पळीसहीत ठेवावा. भाड्याचे झाकण बंद करावे नंतर दोन मिनिटांनी पळी काढावी. हि भाजी भाता सोबत तोंडी लावावी. याच भाजीत सुकी कोलंबी घातल्यास भाजी रुचकर लागते.

Source : Marathi Unlimited.

खजुराचा रोल

$
0
0

Khajurcha Roll Recipes.

khajur ka roll recipes

साहित्य –: बिया काढलेल्या खजुराचा बारीक करून गोळा, दोन कप दुध, अर्धा कप साय ( मलई ) एक मोठी चिमुट सोडा, अक्रोड चुरा एक वाटी, खोबर्याचा कीस अर्धी वाटी.

कृती -: प्रथम कढईला तूप लाऊन घ्यावे. त्यानंतर खोबरा कीस सोडून ईतर सर्व पदार्थ टाकावेत. हे सर्व शिजवून घ्यावेत. त्यानंतर पोळपाटावर अर्धां खोबरा कीस पसरवून त्यावर ते मिश्रण हलकेच पसरवावे नंतर वरून परत खोबरे कीस पसरवावे व त्याचा रोल तयार करावा. गार झाल्यांनतर त्याचे स्लाईड कापावेत. हे स्लाईड चविष्ट लागतात व पौष्टिक हि होतात.

Source : Marathi Unlimited.

सोयाबीनचे वडे

$
0
0

Soybeanche wade Recipes.

soybeanche wade recipes

साहित्य -: दोन वाट्या सोयाबीन पीठ, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, धने, जिरेपूड, हळद, लाल तिखट, तीळ ,कांदा,  कोथिंबीर, अर्धा लिंबू, थोडेसे हिंग, तेल.
कृती -:  प्रथम सर्व पीठ एकत्रित करून, एक पळी गरम तेलाचे मोहन करावे. धने,जिरे पावडर, तिखट किंचित हळद,चवी नुसार मीठ, तीळ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर व लिंबूरस पिळावा. हे सर्व पिठात घालून कोमट पाण्याने घट्ट भिजवावे. अर्धातास मूरत ठेवल्या नंतर तेलाच्या हाताने पीठ थोडे थोडे मळावे. त्याचे प्लास्टिक च्या कागदावर थापून थोडे चापटसर वडे बनवावेत, हे वडे मध्यम आचेवर तळावे. गरमागरम वडे फार चविदार लागतात.

Source : Marathi Unlimited.

रवा इडली (तामिळनाडू)

$
0
0

Rawa Idali , Tamil-Nadu Special.

रवा इडलीला ‘इन्स्टन्ट’ इडली म्हणतात. या आयत्यावेळी करता येतात.

rawa idali
साहित्य –: एक कप रवा (बारीक) एक कप शेवया, एक गाजर, एक लहान बिट, १/२ वाटी सोललेला हिरवा वाटाणा, १/२ वाटी फरस बी,  २, ३ हिरव्या मिरच्या, थोडी मोहरी, एक चमचा उडीद दाल, एक चमचा चना डाळ,  २, ३ लाल मिरच्या, ५, ६ काजू, एक चमचा बेदाणा, कढीनिंबाची पाने, कापलेली कोथिंबिर, मीठ, दोन चमचे खोबरेल तेल, तीन कप दही, एक चमचा तूप, केळीची पानें.
कृती –: दोन चमचे तुप गरम करून त्यात शेवया तांबूस परतवून घ्याव्या. उरलेल्या तुपातून रवा थोडा भाजून घ्यावा. गाजर,बित किसून घ्यावा. फरसबी अगदी बारीक कापावी. उरलेले तेल, तूप गरम करून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली कि उडीद डाळ व चणाडाळ घालून परतावी . त्यात मिरची, कढीलिंब घालावा. काजूचे तुकडे व बेदाणा घालून दोन मिनटे परतून खाली काढावे. हे सर्व दह्यात घालावे. हिरवी मिरची बारीक कापून घालावी. सर्व कापलेल्या भाज्या व वाटाणा दह्यात घालून मीठ घालून सर्व ढवळून नेहमीच्या इडलीप्रमाणे मिश्रण तयार करावे . इडलीच्या साच्यातील वाट्यांमध्ये तूप लावलेले केळीच्या पानाचे तुकडे घालावे. त्यावर इडलीचे मिश्रण थोडे थोडे घालून नेहमीप्रमाणे इडल्या वाफवून काढाव्या. गरम इडली हिरव्या चटणीबरोबर खाण्यास घावी. तांदूळ व्यर्ज असलेल्या मधुमेहासारख्या व्याधी असलेल्या लोकांना या इडल्या खत येतील.

Source : Marathi Unlimited.

रुचिरा: गाजराच्या वड्या

$
0
0

Gajarchya wadya.

gajar wadi food recipes

साहित्य: चार वाट्या गाजराचा कीस,एक वाटी खवा,एक चमचा वेलची पूड, काजू-बदामाचे काप, एक चमचा तूप.

कृती :  कढईत चमचाभर तूप घालून गरम झाले किगाजराचा कीस परतून घ्यावा. नंतर साखर घालून मंद आचेवर शिजू द्यावे. सतत ढवळावे. दुसर्या भांड्यात खवा परतून घ्यावा. गाजर व साखरेचे मिश्रण शिजल्या नंतर घट्ट येऊ लागले की त्यात परतलेला खवा घालावा. नंतर मंद आचे वर हे मिश्रण घट्ट होऊ द्यावे. गोळा कढई पासून सुटू लागला कि त्यात वेलची पूड मिसळावी. ताटाला तुपाचा हात फिरवुन त्यावर गोळा जाड पोळी प्रमाणे थापावा. वरून काजू-बदामाचे काप थापावे. गार झाल्यावर वड्या सुरीने कापाव्या.

Source : Marathi Unlimited.

Get Latest collection of food recipes on Marathi unlimited. read Gajar Wadi Recipes tips here.

रुचिरा : चना रोल

$
0
0

Chana Roll, Chana Dish.

chana roll food recipes

साहित्य:  एक वाटी हिरवे चणे वाफवून घ्यावे. एक वाटी  हिरवे साधे चणे ( हिरवे पण वाफवलेले नकोत ) ७ ते ८ काजू तुकडे, ७ ते ८ किसमिस, १/२ वाटी ब्रेड चुरा, एक चमच अनार दाणे, एक छोटा चमच मिरची पावडर थोडी हळद पावडर, १/२ चमचा गरम मसाला, चुटकी भर हिरवा रंग, चवी नुसार मीठ, तेल.

कृती:  दोन्ही प्रकारच चणे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे, वेगवेगळे ठेवावे. ब्रेड चुरा, अनार दाणे, मसाला  मीठ, मिरची पावडर, व हिरवा रंग घालून बिन शिजलेल्या चण्याच्या मिश्रणात एकत्रित करावे, त्याचे रोल तयार करावे. ( मात्र त्या रोलच्या आंत एक काजू पीस, किसमिस, व शिजलेल्या चण्याचे मिश्रण  ( त्यात प्रथम किंचित मीठ घालावे )  भरावे व नंतर ते रोल  गरम नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून सर्व बाजुने तळावे.

Source : Marathi Unlimited.


चना कबाब

$
0
0

Chana Kabab food recipes.

chana kabab food recipes

चना कबाब : साहित्य :  १०० ग्राम मोठे चणे, १०० ग्राम पनीर, एक पाव बटाटे, तीन चमच शहाजिरा, १ ईंच आले, ७ ते ८ हिरव्या मिरच्या तुकडे केलेल्या, कोथिंबीर बारीक कापलेली, थोडे तूप, चवी नुसार मीठ, तिखट, थोडी हळद पावडर.

कृती :  चणे प्रथम भिजवून ठेवावेत. नंतर त्याला उकडून शिजवावेत. बटाटे उकडून घ्यावेत. किसनीने किसून घ्यावे. चणे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. पनीर व आले किसून घ्यावे. हे सर्व मिश्रण एकत्रित करून त्यात हिरवी मिरचीचे बारीक तुकडे कोथिंबीर, चवी नुसार मीठ, तिखट, थोडी हळद घालून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावे.  हाताला थोडे तूप लावून त्याचे लांबट गोल आकार देवून गोळे तयार करावेत व गरम तेलात लालसर तळावेत. हिरव्या मिरचीच्या चटणी सोबत खाण्यास घ्यावे.

Source : Marathi Unlimited.

राजस्थानी रेसिपी- बाटी- मसाला तांक

$
0
0

Rajastani Buttermilk, Bati Masala Tak.

rajastani butter milk

बाटी चे साहित्य – दोन कप जव चे पीठ, चवी नुसार तिखट, मीठ, थोडी सोफ, चिमुट भर खाण्याचा सोडा, १/२ चमचा धने पावडर, १/२ चमचा जिरे पावडर, १/२ चमचा  मसाला, एक चमचा तूप.

ताक - साहित्य– १/२ लिटर ताक, ५० ग्राम बाजऱ्याचे पीठ, चवी नुसार मीठ, १/२ जिरे पावडर, बारीक कापलेला कांदा.

कृती–  (जव म्हणजे बाजारात गहू प्रमाणेच लांब आकारात जव असते.)  जवच्या पिठात तूप सोडून सर्व साहित्य टाकून एकत्रित करून चांगले मिसळून घेणे. नंतर एक चमच तूप टाकून मिक्स करून पाण्याने भिजवून घेणे( पोळ्याची कणिक प्रमाणे) . त्याचे गोल गोळे बनविणे. काड्या जाळूननिखारे तयार करून त्यावर गोळे चांगले उलट-पालट करून भाजून घेणे.  त्याच्या वर काळे डाग व राख झाडून स्व्च्छ करून पिघललेल्या तुपात टाकून नंतर बाहेर काढावे.

तांक – कृती – बाजरीचे पीठ ताकांत चांगले मिक्स करून गुठळी होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी.त्यात चवी नुसार मीठ, टाकून उकळी येऊ घ्यावे. चमचा फिरवत राहावे, उतू येऊ नये, पीठ शिजल्या प्रमाणे झाले कि खाली उतरवून त्यात जिरे पावडर टाकावे व बारीक चिरलेला कांदा टाकावा. व नंतर बाटी व ताक खाण्यास घ्यावे. ( याला राजस्थानी बाटी – राबडी असे म्हणतात.)

Source : Marathi Unlimited.

रुचिरा- चटपटे स्टार

$
0
0

Chatpate Stars food recipes tips.

shankarpali recipe chatpate stars

साहित्य -: १०० ग्र्याम चना, १०० हिरवे मुग ( वाळलेले ) १०० ग्र्याम उडीद,५० ग्राम बाजरीचे पीठ, १० ग्राम मक्याचे पीठ, १०० ग्राम मैदा, १०० ग्राम सोयाबीनचे पीठ, चवी नुसार मीठ, एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा जिरे, १/२ चमचा काळी मिरी पावडर, थोडी हळद, एक चमचा ओवा. तळणाचे तेल.

कृती–  मिरची पावडर , हळद, मीठ सोडून सर्व साहित्य थोडे थोडे भाजून घ्यावेत. व बारीक करून घ्यावे. जास्त जाड ठवू नये  चाळणीने चालून घ्यावे. नंतर त्याला एक लहान वाटी गरम तेलाचे मोहन करावे, हे सर्व एकत्रित करून त्यात चवी नुसार तिखट, मीठ व थडी हळदपावडर टाकावी व कोमट पाण्याने कडक भिजवावे.  त्या नंतर ओल्या कपडा मांडून मुरायला ठेवावे  एक तासाने त्यांचे गोळे बनवून जाड ठेवून पोळी लाटावी व स्टारच्या आकारात त्याचे बिस्कीट पाडावे व नंतर गरम तेलात तळावे.

रुचिरा- चटपटे स्टार.

साहित्य : १०० ग्र्याम चना, १०० हिरवे मुग ( वाळलेले ) १०० ग्र्याम उडीद, ५० ग्राम बाजरीचे पीठ, १० ग्राम मक्याचे पीठ, १०० ग्राम मैदा, १०० ग्राम सोयाबीनचे पीठ, चवी नुसार मीठ, एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा जिरे, १/२ चमचा काळी मिरी पावडर, थोडी हळद, एक चमचा ओवा. तळणाचे तेल.

कृती–  मिरची पावडर ,हळद, मीठ सोडून सर्व साहित्य थोडे थोडे भाजून घ्यावेत. व बारीक करून घ्यावे.जास्त जाड ठवू नये  चाळणीने चालून घ्यावे. नंतर त्याला एक लहान वाटी गरम तेलाचे मोहन करावे, हे सर्व एकत्रित करून त्यात चवी नुसार तिखट, मीठ, व थडी हळदपावडर टाकावी व कोमट पाण्याने कडक भिजवावे. त्या नंतर ओल्या कपडा मांडून मुरायला ठेवावे  एक तासाने त्यांचे गोळे बनवून जाड ठेवून पोळी लाटावी व स्टारच्या आकारात त्याचे बिस्कीट पाडावे व नंतर गरम तेलात तळावे.

Source : Marathi Unlimited.

कारल्याचे प्रकार !

$
0
0

Various food recipes of Bitter Gourd.

कारले कितीही कडू असले तरी त्यांचे खाणे तितकेच महत्वाचे आहे. एक म्हण आहे ”कडू कारले तुपात तळले,साखरेत घोळले तरी कडूच कडू ” तरीहि तर्हे तर्हेने बनवून ते खाल्लेच पाहिजेत.

Bitter Gourd recipes 1   Bitter Gourd recipes3

चिंच गुळाची कारली :
साहित्य– एक पाव कारली, प्रत्येकी दोन चमचे दाण्याचा कूट, तिळ, खसखस पूड, ओल्या नारळाचा चव, प्रत्यकी एक चमचा धने, जिरेपूड व गोडा मसाला, चवीनुसार तिखट -मीठ थोडा चिंचेचा कोळ, गुळाचा एक इंच खडा, कोथिंबीर, तेल, मोहरी, हळद हिंग.
कृती - कारल्याच्या चकत्या करा. त्याला मीठ चोळून कापडात गुंडाळून त्यावर वजन मांडून ठेवा. कारल्यांना पाणी असेल ते काढून टाका.चकत्या स्वच्छ धुवून घ्या. कढईत तेलाची फोडणी करून त्यात सर्व जिन्नस घालून शिजू द्या. नंतर चकत्या घालून  किंचित पाणी घालून भाजी शिजू द्या.

ठेचलेली  कारली :
साहित्य:  एक पाव कारली, दोन कांदे , चवी नुसार तिखट,मीठ प्रत्यकी एक चमचा जिरे, धने पूड.  पंजाबी पद्धतीचा मसाला. एक चमचा लिंबाचा रस  तेल, मोहरी हळद.व हिंग.
कृती– कारली चिरून भांड्यात ठेचून घ्या.त्याना मिठात चांगले घोळून त्याचे पाणी पिळून काढा. कांदे बारीक चिरून घ्या.व नंतर  कार्ल्याचा चोछा स्व्च्छ धूवुन निथळून घ्या, कढईत जरा जास्त तेल घालून फोडणी तयार करा. त्यात कांदा घालून लालसर होई स्तोवर परता नंतर तीखट  मीठ चवी नुसार धने, जिरे पूड, मसाला वै. घाला फोडनी शिजल्या न्नतर कारले चोथां घाला व मंदाग्नी वर शिजू द्या. भाजी शिजल्या नंतर शेवटी लिंबाचा रस घाला, कोथिम्बिर घाला.

डाळ कारले :  वरील प्रमाणेच पण बिजलेली चना डाळ मिश्रित कारलेचोथा भाजी बनवा. अजिबात कडू लागत नाही. त्यात थोडे खोबरे किसाचा वापर करावा.

भरली कारली :
साहित्य: एक पाव एकसारखी कारली, दोन मोठे कांदे, दोन चमचे हिरवी मिरची वाटलेली, अएक चमचा आले-लसून पेष्ट, एक चमचा आमचूर पावडर, एक चमचा बडीशेप पावडर, चवीनुसार तिखट-मीठ, हळद, तेल, पक्का दोरा, एक चमचा धने पावडर.
कृती:  कार्ल्या वरची ख्ब्दीत टोके सुरीने थोडी थोडी काढून टाका, कारल्याच्या मधोमध  उभा कापदेवून त्यात मीठ भरा. एक, दोन तास तशीच ठेवा. पाणी सुटल्या नंतर ते काढून टाका. बिया जास्त जाड असतील तर त्याही काढून टाका. नंतर दोन तीन पाण्यात धुवून टाका. कापडाने कोरडी करा. कढईत तेल गरम करून त्यात कारली थोडी तळून घ्या. कांदा अगदी बारीक चिरा, कढईत तेल घालून कांदा परतून घ्या. आले-लसून पेष्ट टाका, त्यात आमचूर पावडर, बडीशेप पावडर, धने पावडर, तिखट-मीठ, फोडणी करून शिजवून घ्या.हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यावर कारल्यान मध्ये भरा.दोर्याने कारली बांधून घ्या.  भांड्यात हि कारली तेलात परत परतून घ्या. शिजली कि थंड झाल्यावर त्याचा दोरा काढू टाका. त्याबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका व भाकरी सोबत खाण्यास द्या. हि भाजी–भाकरी  आपण प्रवासाला नेऊ शकतो.हि भाजी दोन, तीन दिवस टिकू शकते.

Source : Marathi Unlimited.

बटाटे दहीवडा !

$
0
0

Batata Dahi Vada recipe. unique way of recipes, read all Indian recipes.

batata dahi wada recipes

साहित्य: दीड वाटी उडदाची डाळ, एक पाव बटाटे, पाच हिरव्या मीरच्या, आल्याचा तुकडा, मीठ, कोथिंबीर. चार ते पाच वाट्या दही , एक वाटी ओले खोबरे, चार वाटलेल्या मिरच्या एक चमचा जिरे पुड व मीठ.

कृती: उडदाची डाळ प्रथमच तीन ते चार तास भिजत टाकावी. नंतर उपसून थोडी सुकवुन वाटावी, बटाटे उकडून सोलून किसून घ्यावे. वाटलेली डाळ, किसलेले बटाटे, चवी पुरते मीठ, बारीक कोथिंबीर, वाटलेले आले, मिरच्या एकत्र करावे. त्याचे छोटे गोळे करावे. व मध्य भागी छिद्र करावे. नंतर गरम तेलात तळून घ्यावे. दह्या मध्ये वाटलेल्या मिरच्या, ओले खोबरे, मिरे पूड व मीठ घालून कालवावे. (मिक्स करावे) त्यात तळलेले वडे दह्यात घालून ठेवावे. व सर्व्ह करावे.

Viewing all 207 articles
Browse latest View live