साहित्य -: सात-आठ आलू, सात-आठ हिरव्या मिरच्या, एक चमचा गरम मसाला, एक चमचा भाजून घेतलेला खसखस, आल्याच तुकडा, चार-पाच लसून पाकळ्या, थोडे कॉर्नफ्लोअर.
कृती :- पालकाची पाने खुडून घ्यावी,चाळणीवर ओतून निथळावी. पातेल्यात घालून मंदाग्नी वर शिजत ठेवावी सर्व पाणी सुकू द्यावे व मिक्सर मधून काढून घ्यावे. आलू उकडून साले काढून किसुन घ्यावे. नंतर वाटलेला पालक, किसलेले आलू, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, आले, लसून पेस्ट भाजलेली खसखस, चवी नुसार मीठ एकत्रित करून त्याचे लिंबाएवढे पण चपटे गोळे करून गरम तेलात गुलाबीसर तळावे. प्लेट मध्ये सजवून खाण्यास द्यावे.