साहित्य – 1/2 कप गव्हाचे पीठ , 2 टेबलस्पून बेसन , 1 टीस्पून अद्रक लसणाची पेस्ट , 1 टीस्पून लाल मिरची पावडर 1 टीस्पून हळद
1/2 टीस्पून जिरे , 1 टेबलस्पून तेल , चवीप्रमाणे मीठ , 1/2 तुरीची डाळ , 1/4 कप तेल , 1 कांदा , 2 टोमॅटो, 1 टेबल्स्पून लसन अद्रक ची पेस्ट , 3/4 टेबल्स्पून लाल मिरची पावडर , 1/2 टीस्पून हळद , 1 टीस्पून आमचूर पावडर ,1 टीस्पून काळा मसाला , 1/2 टीस्पून हिंग , 1 टीस्पून मोहरी , 1 टीस्पून जिरे , 2 टेबलस्पून कोथिंबीर , 3/4 टेबलस्पून साखर
कृती -: तुरीची डाळ धुऊन कुकरमध्ये शिजवून घेणे. कांदा टोमॅटो चिरून घेणे, सर्व मसाले काढून ठेवणे.कणकेमध्ये बेसन घालून तिखट, मीठ, मसाला, हळद घालून पीठ चांगले मळून घेणे, एक टेबलस्पून तेल घालून चांगले पीठ माळून ठेवणे.. पंधरा मिनिटे रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवणे.मळलेल्या पिठाची पोळी करून शंकरपाळ्या सारखा आकार देऊन ते कापून घेणे,गॅसवर कढई तापत ठेवणे त्यामध्ये तेल घालने, तेल तापले की त्याच्यामध्ये मोहरी, हिंग घालून परतावे, त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालून एक मिनिट शिजू देणे, आता त्याच्यामध्ये लसन अद्रक ची पेस्ट घालावी, जिरं घालावं, आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालून चांगलं शिजू देणे, आणि दोन मिनिटांसाठी झाकण ठेवणे, आणि टोमॅटो चांगला शिजला की त्याच्यामध्ये सर्व मसाले, चवीनुसार मीठ घालून चांगलं शिजू देणे,टोमॅटो मसाले छान तेल सोडायला लागेल की तेव्हा त्यामध्ये दीड कप पाणी घालावे, आणि चांगले शिजू द्यावे, नंतर त्यामध्ये शिजवलेलं वरण घालून फिरवून घेणे, अडीच तीन कप पाणी घालून चांगले पातळसर वरण करून घ्यावे, याच्यासाठी वरण पातळ पाहिजे आपल्याला, कारण “ढोकली” टाकल्यावर ते वरण अजून घट्ट होते म्हणून ते पातळ ठेवावे,वरणाला दोन-तीन उकळ्या आल्या की त्याच्यामध्ये आपण तयार केलेली ढोकली घालावी.. आणि मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे,आता दहा ते पंधरा मिनिटांनी आपली ढोकली छान शिकलेली आहे वर्णांमध्ये,, आता सर्व्हींग बाऊल मध्ये काढून त्यावर कोथिंबीर घालावी.. आणि छान गरम गरम सर्व्ह करावे.
The post दाल ढोकली appeared first on Marathi Unlimited.