Quantcast
Channel: Marathi Recipes : Maharashtra Food collection, read recipes, Indian recipes, food tips, hot recipes, Maharashtra Food Guide
Viewing all articles
Browse latest Browse all 207

कश्मीरी पुलाव

$
0
0

I love it very much. As it is mildly spiced and a little sweet, you can pair it with any spicy gravy. Today we will learn how to make Kashmiri Pulao …the kashmiri pulao is aromatic, mild and sweet…

kashmiri-pulao-1

Kashmiri-pulao-1

साहित्य-: बासमती तांदूळ दोन वाट्या, सफरचंद २, अननसाच्या चकत्या ( ताजा अननस स्वच्छ करून साखरेच्या पाण्यात वाफवून नंतर वापराव्या. २ वाटी मटार, १ वाटी पनीरचे तुकडे (तळलेले )७ जर्दाळू, काजू तुकडे, बादाम काप, निसलेले पिस्ते, बेदाणे,  चिमुटभर हिंग, थोडी केशर, ४ लवंगा, दोन तुकडे दालचिनी, ५ सुक्या कश्मीरी मिरच्या, ४ साधी वेलचि, दन मोठी वेलची, एक तमाल पत्री, १० काळीमिरी , ५ चमचे तूप, आणि मीठ, पाणी

कृती -: तांदूळ एकतास अगोदर धुवून निथळत ठेवावे. एक तास पूर्वी बादाम पिस्ते पाण्यात भिजवून ठेवावे नंतर पाण्यातुन काढून ठेवावे. सफरचंदाच्या साधारण फोडी करून ठेवाव्यात बिया काढून घ्याव्या. जर्दाळू मधील बिया काढून त्याही पाण्यात भिजवून काढून ठेवाव्या.
पातेल्यात तूप गरम करावे त्यात हिंग घालावे नंतर लवंग,दालचिनी, दोन्ही प्रकारचे वेलदोडे, मिरे तमालपत्री,  जायपत्री,  सुक्या मिरच्या, घालून फोडणीत शिजू द्याव्या नंतर निथळलेले तांदूळ, घालून चांगले परतावे व चवीनुसार मीठ घालावे . नंतर गरम पाणी टाकून भात अर्धवट शिजू द्यावा, दुसर्या भांड्यात थोडे तूप घालून फोडणी करावी त्यात कांदा तळून घ्यावा, मटार ही तुपावर भाजून घ्यावे, हे सर्व बाजूला काढून ईकडे अर्धवट शिजलेल्या भातात सर्व फळांच्या फोडी मटार, काजू-बेदाणे जर्दाळूचे तुकडे, केशर (दुधात घोटलेले असावे) घालावी, व परतून मिसळून घ्यावे, नंतर परत वाफ आणवून भात मोकळा शिजू द्यावा. पुलाव वाढताना त्यात तळलेला कांदा, बदाम-पिस्त्याचे काप व चेरी वरून सजवून द्यावी.

The post कश्मीरी पुलाव appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 207

Trending Articles