साहित्य -: दोन वाट्या चना डाळ, तितकीच साखर,तीन ते चार विलायची पूड , अर्धी वाटी तूप किंवा शुद्ध वनस्पती डालडा,एक वाटी मैदा अर्धी वाटी चाळलेली कणिक.
कृती -: कणिक व मैदा चाळून घ्यावा त्यात चिमटीत येईल एवढे मीठ घालावे,व थोडे तेलाचे मोहन द्यावे व भिजवून ठेवावे,भिजविताना जास्त कडक किंवा एकदम गिले भिजवू नये मात्र मुलायम भिजवावे. व तीस मिनिटे मुरु द्यावे. चना डाळ कुकर मधून मुलायम शिजवून घ्यावी शिल्लक असलेले पाणी काढून ध्यावे नंतर त्यात डाळीच्या प्रमाणात साखर घालून मिक्सर मधून बारीक करावे नंतर ते पातळ होईल म्हणून बिघडली असे न समजता मंद आचेवर कढईत एक पळी डालडा गरम करावा नंतर त्यात ते बारीक केलेले पुरण हळू हळू परतावे( बुडाला लागू न देता) काही वेळाने ते घट्ट येईल मात्र नरम ठेवावे. कडक करू नये. त्यात विलायची पूड करून मिक्स करावी.याप्रमाणे पुरणाला स्वाद येतो, पुरण मुलायम होते.
पोळी बनविताना साधारण बोराच्या आकाराचा कणकेचा गोळा हातावर चोळून त्याची लाटी करावी त्याला हळूहळू हातावरच वाटीचा आकार द्यावा व त्या वाटीला आतील बाजूने भोवताली प्रथम डालडा लावावा नंतर साधारण चिकूच्या आकाराचा पुरणाचा गोळा घालून वाटीचे तोंड बंद व्यवस्थित बंद करावे. (आतून वाटीला डालडा लावल्याने पोळी शिजताना पुरण बाहेर येत नाही) व हळूवार पोळी लाटावी. लाटताना जास्त कणकेचा वापर करू नये. शक्य तितकीच पातळ लाटावी व तव्यावर एकदम मंद
आचेवर भोवताली डालडा अथवा तुपाचा घेर देऊन पाती शिजवावी,या प्रमाणे दोन्ही बाजूने पोळी व्यवस्थित शिजवावी या प्रमाणे प्रत्येक पोळी तयार करावी व तुपासोबत स्वादिष्ट व मुलायम पूर्णपोळी खाण्यास द्यावी .
Recipes tips for Swadist Puran Poli to cook in Home.
The post सुगरणी दरबार: स्वादिष्ट पूरण पोळी appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.