Coconut Milk Rice is an Indian recipe. It is made up of coconut milk, rice, lemon, coriander etc. Learn How to make coconut milk Rice by easy method. It has more nutritional values in it due to coconut milk.
साहित्य :- नारळाचे घट्ट दुध एक वाटी, लांब असलेला तांदूळ एक वाटी, लिंबाचा रस दोन चमचे, मीठ, साखर चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेली अर्धी वाटी, बारीक चिरलेला लसून पाकळ्या चार ते पाच, हिरवी मिरची तीन ते चार, तेल गरजेनुसार.
कृती :-
- प्रथम तांदूळ स्व्च्छ धुवून तेलात परतून घ्यावे ( तपकिरी रंगावर).
- दुसऱ्या भांड्यात एक वाटी पाणी तापत ठेवून त्यात बारीक चिरलेला लसून, हिरवी मिरची चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस टाकून ते पाणी उकळीला आले कि त्यात तांदूळ घालावा व पाणी सुकत आले कि त्यात नारळाचे दुध घालुन चांगले मिळवून घ्यावे.
- नंतर मंद आचेवर शिजू द्यावे.
- भात मोकळा होईल असाच शिजवावा; गरम सर्व्ह करावा.
- सर्व्ह करते वेळी त्याच्याभोवताली ओल्या नारळाचे पातळ काप ठेवावेत.
The post नारळदुधातला भात appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.