Idlicha Upma-Idli upma is a very delicious dish made with the leftover idlys.You can serve this dish in the breakfast which can be prepared in no time.It will take just 5-10 minutes.
आपण ईडल्या केल्यानंतर बऱ्याचदा उरतात, तर कधी सांबार संपल्या नंतर त्या कशासोबत खाव्या हा प्रश्न पडतो. तर त्या वाया जावू नये म्हणून त्या काही वेळ फ्रीज मध्ये ठेवून द्या व नंतर त्याचा उपमा करून खायला द्याव्या.
साहित्य :-
- आठ ते दहा इडल्या
- लाल सुक्या मिरच्या दोन
- अर्धा चमचा मोहरी
- एक चमचा बिना छील्क्याची उडदाची डाळ
- किंचित हिंग
- अर्धी वाटी खोबरे कीस
- तेल
कृती :-
- फ्रीज मधून इडल्या काढून त्या मोकळ्या करून घ्याव्या याकरता तुम्ही मीक्संरचा वापर करू शकता.
- पातेल्यात फोडणीसाठी तेल गरम करण्यास ठेवावे.
- तेल गरम झाल्यानंतर त्यात हिंग, मोहरी,मिरचीचे तुकडे उडदाची एक चमचा डाळ किंचित चवी नुसार मीठ घालावे व मोकळ्या केलेल्या इडल्या एकत्रित करून परतून घ्यावे.
- नंतर त्यात खोबरे कीस घालावे व दोन ते तीन मिनिटे परतल्या नंतर उपमा तयार.
- असल्यास वरून बारीक चिरून कोथिंबिर घालावी.
The post इडलीचा उपमा appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.